Pimpri news : राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंचवड विधानसभा अध्यक्षपदी संगीता कोकणे, पिंपरी विधानसभा अध्यक्षपदी पल्लवी पांढरे
Pckhabar-पिंपरी चिंचवड महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसची पुर्नबांधणीस सुरुवात केली आहे. चिंचवड विधानसभा अध्यक्षपदी संगीता कोकणे व पिंपरी विधानसभा अध्यक्षपदी पल्लवी पांढरे यांची नियुक्ती केली आहे. महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, नगरसेविका स्वाती उर्फ माई काटे, संगीता ताम्हाणे, प्रज्ञा खानोलकर, सुलक्षणा धर, प्रवक्ते फजल शेख, मनीषा गटकळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून महिला संघटन सक्षम करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्ष, नगरसेविका वैशाली काळभोर यांनी पिंपरी व चिंचवड विधानसभा अध्यक्षासह सपना घाडगे (उपाध्यक्षा, पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस), रूपाली भंगाळे ( उपाध्यक्ष, चिंचवड विधानसभा), अर्चना राऊत (उपाध्यक्ष, पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस), भारती कदम (उपाध्यक्ष, पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस) या महिलांच्या नियुक्त करून महिला संघटन मजबूत केले आहे.










Leave a Reply