Pimpri news: शहरात दुचाकी, मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ; नागरिक हैराण

Pimpri news: शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ; नागरिक हैराण
Pckhabar-कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक गर्तेत अडकलेल्या  नागरिकांना दुचाकी चोर, मोबाईल चोरट्यांनी हैराण केले आहे. गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहर परिसरात दुचाकी चोर आणि मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. तळेगाव दाभाडे, हिंजवडी, वाकड आणि चिंचवड परिसरातून अज्ञात चोरट्यांनी चार दुचाकी चोरून नेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.  
दत्तात्रय बाजीराव लोंढे (वय-39, रा. गोळेवाडी, आंबी, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी (एम एच 14,डी डी 3785) घरासमोरून चोरून नेली.  
जगदीश प्रफुल्ल वेलिंग (वय 40, रा. प्रभात रोड, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनीमंदिर वाकड सर्विस रोडवरून वेलिंग यांची 30 हजारांची मोपेड दुचाकी (एम एच 47, ए ए 6855) चोरून नेली आहे. रामकृष्ण देवराम पाटील (वय 42, रा. नखातेवस्ती, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाटील यांची 15 हजारांची दुचाकी (एम एच 14, ई के 0538) अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरून चोरून नेली आहे.
सीताराम पांडुरंग भागवत (वय 55, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भागवत यांची 20 हजारांची दुचाकी (एम एच 14, बी बी 4485) त्यांच्या घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *