Pimpri news: पालिकेचे उत्पन्न ‘लॉकडाउन’, आयुक्त म्हणतात …
Pckhabar- कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनचा फटका पिंपरी-चिंचवड महापालिकेला मोठ्या प्रमाणावर बसला आहे. आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यात मालमत्ता करातून पालिका तिजोरीत केवळ 220 कोटी 1 लाख रुपये जमा झाले आहेत. 1 लाख 63 हजार 279 मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे.पालिकेची आर्थिक घडी विस्कटली आहे.
उत्पन्न कमी मिळेल हे अपेक्षित होते. पुढील सहा महिन्यात उत्पन्नाचा बॅकलॉग भरून काढला जाईल. त्यासाठी विशेष योजना आणल्या आहेत, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. मागीलवर्षी पहिल्या सहा महिन्यात 341.56 कोटी रुपये जमा झाले होते. त्यातुलनेत यंदा तब्बल 121.55 कोटी रुपये उत्प्पन कमी मिळाले आहे. दरम्यान,
पिंपरी-चिंचवड शहरात आजमितीला पाच लाख 27 हजार 338 मालमत्ता आहेत. त्यामध्ये निवासी चार लाख 47 हजार 8, बिगरनिवासी 46 हजार 828, औद्योगिक तीन हजार 700, मोकळ्या जागा आठ हजार 781, मिश्र 15 हजार 819 आणि इतर पाच हजार 202 मालमत्ता आहेत. या मालमत्तांना महापालिकेकडून कर आकारणी केली जाते.
”लॉकडाऊनमुळे उत्पन्न कमी मिळेल हे अपेक्षित होते. कोरोनामुळे उत्पन्न घटले आहे. व्यवहार सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्यात उत्पन्न वाढ दिसायला लागेल. त्यासाठी विशेष योजना आणल्या आहेत, असे आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले.










Leave a Reply