Talegaon News : तळेगावात साध्या पध्दतीने नवरात्रौत्सव साजरा करण्याचा निर्णय
Pckhabar- कोरोना संसर्गामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा नवरात्र उत्सव, दुर्गापुजा, दसरा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे परिपत्रक महाराष्ट्र शासन गृह विभागाचे उपसचिव शिरीष मोहोड यांनी प्रशासनास कार्यवाहीसाठी दिले आहे.
त्या अनुषंगाने खालील मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक नवरात्र उत्सवासाठी मंडळांनी स्थानिक प्रशासन यांचे धोरणानुसार पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील, मंडपाची उभारणी मर्यादित असावी, देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळाची 4 फूट तर घरगुती 2 फूट असावी, मूर्ती शाडूची पर्यावरण पूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे, विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करावे, नवरात्र उत्सवा करिता वर्गणी देणगी स्वच्छेने दिल्यास तिचा स्वीकार करावा, गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नये, त्याऐवजी आरोग्य विधायक उपक्रम शिबिरे (रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे.
आरती, भजन, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, प्रदूषणाचे नियम पाळावेत, देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक द्वारे उपलब्ध करून देण्यावर जास्तीत जास्त भर देण्यात यावा, देवीच्या मंदिरामध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी, प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणार्या नागरिक भाविकासाठी शारीरिक अंतराचे (फिजिकल डीस्टन) नियम पाळण्यात यावा, देवीचे आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नये, विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून नियोजित स्थळी विसर्जन करावे, लहान मुले, वरिष्ठ नागरिक यांनी विसर्जनस्थळी जाणे टाळावे.
दसर्याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व मिळून सर्व नियम पाळून प्रतीकात्मक स्वरूपाचा असावा. रावण दहन कार्यक्रम आवश्यक तेवढ्याच किमान व्यक्तीत करावा, कार्यक्रमस्थळी जास्त प्रेक्षक न बोलविता फेसबुक इत्यादी समाज माध्यमातून थेट प्रक्षेपण करावे. अश्या प्रकारच्या परिपत्रकात सूचना दिल्या असून उस्तव सुरु होण्याच्या कालावधींध्ये अजून काही शासनाच्या सूचना प्रसिध्द झाल्यास त्याचे अनुपालन करावे. या प्रकारे आदि सूचना नवरात्र उत्सव, दुर्गापुजा, दसरा उत्सवाचे परिपत्रक प्रसिध्द करून महाराष्ट्र शासन गृह विभागाचे संबधित प्रशासनास कार्यवाहीसाठी दिले आहे.
Talegaon News : तळेगावात साध्या पध्दतीने नवरात्रौत्सव साजरा करण्याचा निर्णय










Leave a Reply