Pimpri corona News: शहरात आज 764 नवीन रुग्णांची नोंद, 827 जणांना डिस्चार्ज तर 17 मृत्यू

Pimpri corona News: शहरात आज 764 नवीन रुग्णांची नोंद, 827 जणांना डिस्चार्ज तर 17 मृत्यू

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 764 नवीन रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 78 हजार 81 वर पोहोचली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 827 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात आजपर्यंत 78 हजार 81 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 65 हजार 13 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1318 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 489 अशा 1807 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 4559 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

शहरातील 12 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 5 अशा 17 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात भोसरी,
चिंचवड, च-होली, दिघी, काळेवाडी, चिखली, पिंपरी, कासारवाडी, हडपसर, चाकण, मुळशी, सातारा, हिंजवडी
येथील रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *