Pimpri news : पिंपरी चिंचवड सायक्लोथॉन उत्साहात
Pckhabar- पिंपरी चिंचवड सायकलिस्ट्स क्लबच्या वतीने आणि ग्लोबल आय इंस्टिट्यूटच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या सायक्लोथॉन उत्साहात पार पडली. या ऑडॅक्स क्लब पॅरिस यांच्या अधिपत्याखाली जगभर चालू असलेल्या वेगवेगळ्या देशांमध्ये, भारतातील ऑडॅक्स इंडिया रँडॉनीअर च्या परवानगीने पिंपरी चिंचवड शहराला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्याच्या उद्देशाने चालू करण्यात आलेल्या क्लबच्या वतीने सायकलिंग आणि नेत्रदानासाठी लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून सायक्लोथॉन 2020 चे आयोजन करण्यात आले.
क्लबच्या स्थापना झाल्यानंतरचा पहिलाच कार्यक्रम होता. कोरोनाच्या काळात अतिशय सूत्रबद्ध रित्या त्याचे नियोजन केले होते. सर्व सुरक्षिततेची काळजी घेऊन व योग्य त्या परवानग्या घेऊन त्याचे नियोजन करण्यात आले.
50 की मी आणि 100 की मी अशा 2 गटात हि सायक्लोथॉन घेण्यात आली. दोन्ही गटात सध्याच्या साथीच्या पार्श्वभूमीवर फक्त 40 – 40 स्पर्धकांना भाग घेण्याची परवानगी देण्यात आली होती. स्पर्धकांचा उत्साह हा वाखाणण्यासारखा होता. 100 की मी गटाची सुरुवात सकाळी 6 वाजता वाहतूक विभाग पोलीस निरीक्षक मोहन जाधव तर 50 की मी गटाची सुरुवात ऑडॅक्स इंडिया च्या दिव्या ताटे यांच्या हस्ते झेंडा दाखवून झाली.
सायक्लोथॉनचा मार्ग सावित्रीबाई फुले उद्यान वाकड, बालेवाडी, देहूरोड, वडगांव, कामशेत, लोणावळा आणी परत सावित्रीबाई फुले उद्यान असा होता. प्रत्येक स्पर्धकाला स्पर्धा पूर्ण केल्यावर सर्टिफिकेट तसेच मेडल देण्यात आले. सर्वांसाठी आयोजकांनी आरोग्यपूर्ण अशा नाश्ता व चहा ची सोय केली होती .
पी सी एम सी सायकलिस्ट या कल्बचे रेप्रेसेंटेटिव्ह उत्कृष्ठ सायकलिस्ट व फिटनेस आयकॉन डॉ. धनराज हेळंबे, डॉ. बबन डोळस, डॉ. आदेश काळे, मयुर शानबाग, अंशुमन, सागर वाकडे, सिध्दगोंडा पाटील यांनी या इव्हेंटचे आयोजन केले होते.
Pimpri news : पिंपरी चिंचवड सायक्लोथॉन उत्साहात










Leave a Reply