Pimpri news : एकाच ठाण्यात ठाण मांडून बसलेल्या पोलिसांच्या बदल्या
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या प्रस्थापित पोलिसांच्या अखेर पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी बदल्या केल्या आहेत. त्यांनी शहर पोलीस दलातील 399 पोलिसांच्या बदल्या केल्या आहेत. यामुळे मात्र, पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी 5 सप्टेंबर रोजी आयुक्त पदाची सूत्रे स्विकारली. आयुक्त पदाची सूत्रे घेतल्यानंतर एका महिन्याच्या आतच आयुक्तांनी शहर पोलीस दलातील 399 पोलिसांच्या बदल्या केल्या. सहाय्यक फौजदार (13), पोलीस हवालदार (122), पोलीस नाईक (157), पोलीस शिपाई (107) अशा एकूण 399 पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यातील काही पोलीस एकाच पोलीस ठाण्यात मागील काही वर्षांपासून ठाण मांडून बसले होते. त्या प्रस्थापितांच्या पोलिसांच्या बदल्यांमुळे चांगलाच धक्का बसला आहे. पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा, वाहतूक विभाग आणि मुख्यालयातील पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.










Leave a Reply