Pimrpri corona news: शहरातील कोरोनाची रुग्णवाढ घटली, अतिरिक्त आयुक्त म्हणतात..
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णवाढ थोडी कमी झाली ही वस्तुस्थिती आहे. नेमकी कोणत्या कारणामुळे कमी झाली हे निश्चित सांगता येत नाही. पण ही अंतिम नाही. त्यामुळे कोणीही बेफिकीर राहू नये. कायम काळजी घेणे आवश्यक आहे, असे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. जून, जुलै, ऑगस्टमध्ये रुग्णसंख्या वाढीचा वेग मोठा राहिला. जुलै, ऑगस्ट या दोन महिन्यात कोरोनाची सर्वाधिक रुग्णवाढ झाली. चार ते पाच दिवसांपासून रुग्णवाढ एक हजाराच्या आतमध्ये आली आहे. दिवसाला हजाराच्या आतमध्ये नवीन रुग्ण सापडत आहेत. ही दिलासादायक बाब मानली जात आहे.
”शहरातील रुग्णवाढ थोडी कमी झाली ही वस्तुस्थिती आहे. नेमकी कोणत्या कारणामुळे झाली हे निश्चित सांगता येत नाही. परंतु, ऑगस्टमध्ये देखील असा काही कालावधी आला होता. ऍडमिशनची मागणी कमी झाली होती. पण, त्यांनतर पुन्हा वाढली होती. त्यामुळे रुग्णवाढ कमी होतेय हे जरी चांगले लक्षण असले. तरी यामुळे निर्धास्त होण्याचे काही कारण नाही. संपर्कातून होणारा हा आजार आहे. त्यामुळे बेफिकीर न राहता काळजी घेतलीच पाहिजे, असे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले.










Leave a Reply