Pimpri News : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍यांचा सन्मान

Pimpri News : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍यांचा सन्मान
Pckhabar-  पिंपरी चिंचवड परिसरातील शिवामृत ग्रुपच्या वतीने विविध क्रीडा क्षेत्रात मार्गदर्शन करणार्‍या व्यक्तींना उत्कृष्ट संघटक व जीवन गौरव पुरस्कार देवून महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शिवामृत ग्रुप संचालक दत्तात्रय भोसले व शिवामृत ग्रुप पुरस्कार मुख्य आयोजक सुनील साठे उपस्थित होते.
राजू थापा (कराटे), पाशा आत्तार (थाई बॉक्सिंग), फिरोज शेख (हॉकी)  जीवन गौरव पुरस्काराने तर गणेश सिन्हा (कराटे), सहाद शेख (बॉक्सिंग), अनिल लोखंडे (कबड्डी), सतीश राजहंस (थाई बॉक्सिंग),  संतोष म्हात्रे (किक बॉक्सिंग), मुकेश पवार (हॅडबॉल), राजू कोतवाल (क्रिकेट), आशिष उबाळे (बॉक्सिंग),  मृदुला महाजन (स्वॉफ्ट बॉल) उत्कृष्ट क्रीडा संघटक पुरस्काराने गौरव करण्यात आला.
महापौर ढोरे यांनी खेळाडू व मार्गदर्शकांना शुभेच्छा देऊन भविष्यात उत्तम कामगिरी करून महानगर पालिकेच्या लवकिकात भर पडावी असे मत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *