Pune News : संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबीरामध्ये 120 जणांचा सहभाग

Pune News : संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबीरामध्ये 120 जणांचा सहभाग

Pckhabar- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संत निरंकारी मिशनतर्फे घेण्यात आलेल्या आपत्कालीन रक्तदान शिबीराला मोठा प्रतिसाद मिळाला. यामध्ये 120 जणांनी रक्तदान केले. या शिबिराचे उदघाटन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा स्वाती पोकळे यांच्या हस्ते संपन्न झाले.

संत निरंकारी मिशन अंतर्गत संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनद्वारे इंदिरानगर शाखेद्वारे रविवार (दि. 27)रोजी संत निरंकारी सत्संग भवन, गंगाधाम,पुणे येथे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ससून रुग्णालय रक्तपेढी मार्फत 120 युनिट रक्त संकलित करण्यात आले.

ससून रुग्णालय रक्तपेढी, कमांड हॉस्पिटल रक्तपेढी, औंध रुग्णालय रक्तपेढी यांच्या विनंतीनुसार अशा प्रकारचे रक्तदान शिबिर पुणे जिल्ह्यात ताराचंद करमचंदानी (पुणे झोन प्रभारी) यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहेत.
कोरोना व्हायरस या आजाराने महाराष्ट्रात थैमान घातल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच शासकीय यंत्रणा हैराण झाल्या असून याचा प्रभाव आरोग्य यंत्रणेवर देखील पडला आहे. ससून रुग्णालय रक्तपेढी, कमांड हॉस्पिटल रक्तपेढी, औंध रुग्णालय रक्तपेढी यांच्या आवश्यकतेनुसार रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.

रक्तदान शिबिरात प्रशासन-डॉक्टरांनी दिलेल्या सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्यात आले तसेच सोशल डिस्टंसिंग कडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. याच प्रकारचे रक्तदान शिबीर प्रत्येक महिन्याला पुणे जिल्ह्याच्या विविध भागामध्ये निरंकारी मिशन तर्फे आयोजित करण्यात येत आहेत अशी माहिती मंडळातर्फे देण्यात आली. रक्तदान शिबिरामध्ये उपस्थित सर्व रक्तदात्यांचे, मान्यवरांचे आभार इंदिरानगर प्रमुख अनंत दळवी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *