Pimpri News : ‘माझे कुंटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत १० लाख नागरिकांची तपासणी पुर्ण

Pimpri News : ‘माझे कुंटुंब माझी जबाबदारी’ मोहीमेअंतर्गत १० लाख नागरिकांची तपासणी पुर्ण
Pckhabar-पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेच्या वतीने ‘माझे कुंटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम शहरभर राबविणेत येत आहे. या मोहीमेसाठी १३४९ सर्व्हेक्षण पथके शहरात कार्यरत असुन त्यांचेमार्फत आजअखेर एकुण ३ लाख एकोणपन्नास हजार कुंटुबांतील १० लाख ४५ हजार नागरिकांची तपासणी पुर्ण करण्यात आली आहे. अशी माहीती सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.
कोविड १९ नियंत्रणासाठी तसेच मृत्युदर कमी करण्यासाठी व कोविड मुक्त महाराष्ट्र मोहिमे अंतर्गत ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम राबविण्‍याची सुचना राज्य शासनाने दिली असून त्या अंतर्गत गृहभेटी देवून नागरिकांना आरोग्य शिक्षण व त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. कोरोना महामारीची साखळी तोडण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहीम महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असुन या मोहिमेसाठी नागरिकांनी स्वतः हुन पुढाकार घेत या मोहीमेला आजपर्यंत उस्फुर्त असा प्रतिसाद दिला आहे. नागरिकही मनात कोणताही संकोच न ठेवता आपल्या बरोबरच आपल्या कुटुंबांची तपासणी करून घेत आहेत. तसेच प्रत्यक्ष गृहभेट देणाऱ्या महापालिकेच्या टीम ला सहकार्य देखील करीत असुन ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात मदत होत आहे.
शहराची एकुण लोकसंख्या २४ लाख ४ हजाराच्या जवळपास असुन या लोकसंख्येच्या ४३ टक्के म्हणजेच १० लाख ४५ हजार नागरिकांची तपासणी पुर्ण झाली आहे. यामध्ये ३५ हजार त्र्याऐंशी नागरीक कोमॉर्बिड आढळून आले आहेत. तरी पुढील १० दिवसात उर्वरीत नागरिकांची तपासणी करणेत येणार असल्याने नागरिकांनी गृहभेटी देणाऱ्या महापालिकेच्या पथकास सहकार्य करावे असे आवाहन देखील सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *