Dehu News : देहूगावातील ’आर्युसंकेत पंचकर्म’ सेंटरला रूग्णांचा वाढता प्रतिसाद

Dehu News : देहूगावातील ’आर्युसंकेत पंचकर्म’ सेंटरला रूग्णांचा वाढता प्रतिसाद

Pckhabar- कोरोनासारख्या जागतिक महामारीत अनेकांचा आयुर्वेदाकडे कल वाढला आहे. अनेकजण आयुर्वेदिक उपचार पध्दतीचा अवलंब करत असून नागरिकांना विविध आजारांपासून मुक्ती मिळत आहे. देहूगाव परिसरात प्रथमच परिपूर्ण, शास्त्रोक्त पध्दतीने आयुर्वेद व पंचकर्म चिकित्स आर्युसंकेत आयुर्वेदिक क्लिनिक आणि पंचकर्म सेंटरला रूग्णांचा दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत असल्याची माहिती आर्युसंकेत आयुर्वेदिक क्लिनिक आणि पंचकर्म सेंटरचे संचालक डॉ. रोहन रविंद्र चव्हाण यांनी दिली.

डॉ. रोहन चव्हाण यांचे आयुर्वेदात एमडी झाले असून त्यांच्या पंचकर्म सेंटरला देहूगाव, विठ्ठलवाडी, माळवाडी, देहूरोड, तळवडे, सुदुंबरे, येलवाडीसह आदी परिसरातील रूग्णांना लाभ होत आहे.

आर्युसंकेत  क्लिनिक आणि पंचकर्म सेंटरमध्ये सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, मणक्याचे विकार, आमवात, स्नायुंचे आजार, पॅरॅलिसिस, त्वचा विकार, सोरायसिस, खरूज, नायटा, पांढरे ढाग, पिंपल्स, मुरूम वांग, चाई पडणे, स्त्रीयांचे आजार, अनियमित पाळी, वजन वाढविणे, वजन कमी करणे, वंधत्य स्त्री/ पुरूष,  गर्भसंस्कार, मानसिक आजार, अनिद्रा/ निद्रानाश, स्मृतीभ्रंश, चिडचिडेपणा, केस गळणे, केस पिकणे, सौंदर्य चिकित्सा, मूळव्याध, अम्लपित, अलबध्दता, गर्भशयाचे विकार, जुनाट सर्दी, खोकला, दमा/ बालदमा, डोकेदुखी, अ‍ॅलर्जी, वारंवार सर्दी होणे, उच्च रक्तदाब, मधुमेह, ग्रहणी, थायरॉईड, मुतखडा, चेहरा काळवंडणे अशा विविध व्याधींवर शास्त्रशुध्द पध्दतीने उपचार केले जातात.

तसेच विविध प्रकारच्या स्नेहन, शिरोधारा, नस्य, जानुबस्ती, स्वेदन, रक्तमोक्षण, कटीबस्ती, सुवर्णप्राशन या पंचकर्म सुविधा उपलब्ध आहेत.

त्याचबरोबर फेस पॅक, हर्बल हेअर ऑईल, हर्बल सोप, मसाज ऑईल, हर्बल शॅम्पू, डॅन्ड्रफ पॅक, मध आदी हर्बल उत्पादनेही क्लिनिकमध्ये उपलब्ध आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *