Alandi News : आळंदीत आरोग्य सर्व्हेक्षणात 6 हजार 650 कुटुंबांची तपासणी

आळंदीत आरोग्य सर्व्हेक्षणात 6 हजार 650 कुटुंबांची तपासणी

Pckhabar- आळंदी नगरपरिषदेने ’माझे कुटुंब माझी जबाबदारी’ उपक्रमांतर्गत आळंदी नगरपरिषदेच्या 9 प्रभागात एकाच वेळी सुमारे 6 हजार 650 कुटुंबांना घर भेटीतून आरोग्य तपासणी केली. यामध्ये 202 लोकांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली. यामध्ये 29 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. या 29 रुग्णांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली.

या मोहिमेत सुमारे 45 प्रशिक्षित आरोग्य सेवकांची पथके तयार करून सुमारे 112 प्रशिक्षित शिक्षक, कर्मचारी व आरोग्य वैद्यकीय कर्मचार्‍यांचे विशेष सहकार्य झाले. घर भेटीच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य तपासणी मोहिमेत पदाधिकारी व नागरिकांनी प्रतिसाद दिला. या मोहिमेत घरोघरी जाऊन सर्व नागरिकांचे ऑक्सिमीटर व ताप तपासणी यंत्राचे मदतीने नागरिकांची ऑक्सिजन व ताप  याबाबत तपासणी करण्यात आली. खेडच्या तहसिलदार सुचित्रा आमले यांनी कामाची पाहणी करून सेवकांना मार्गदर्शन केले. घर भेटीचे परिसरात जाऊन मुख्याधिकारी जाधव यांच्यासह स्थानिक नगरसेवक सागर बोरुंदीया, प्रकाश कुर्‍हाडे, सागर भोसले, सुनीता रंधवे, स्नेहल कुर्‍हाडे, गटनेते पांडुरंग वहिले, सचिन गिलबिले, माजी नगराध्यक्ष सचिन पाचुंदे, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी आपापल्या भागात नागरिकांचे आरोग्य तपासनीत सहभागी होत नागरिकांमध्ये उत्साह वाढविला.  
    आळंदीत 100 सक्रीय रुग्ण  
आळंदीत 25 सप्टेंबरला 14 रुग्ण आढळले. तर आज 4 रुग्णांना घरी सोडण्यात आले. शुक्रवारअखेर आळंदीत 100 सक्रीय रुग्ण अँक्टिव्ह असून 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 611 रुग्ण बरे होऊन घरी  गेले आहते. एकूण 723 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *