आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटींग घेणारे दोघे गजाआड

आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटींग घेणारे दोघे गजाआड

Pckhabar-आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेकायदेशीररित्या बेटींग घेणाऱ्या दोघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पिंपरीतील वैभव नगर येथे करण्यात आली.

लालचंद देवीदास शर्मा (वय 49, रा. सुखवानी एम्पायर, पिंपरी), चेतन जयरामदास कोटवाणी (वय 50, रा. सी ब्लॉक, 3/15, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वैभव नगर येथे दोनजण आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटींग घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शुक्रवारी (ता. 25) रात्री साडेआठच्या सुमारास वैभव नगर येथील साई आंगण हॉटेलसमोर पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले.
वैभव नगर येथे दोनजण आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटींग घेत असल्याची माहिती

पोलिसांना मिळाली. त्यानुसार शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास वैभव नगर येथील साई आंगण हॉटेलसमोर पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चार मोबाईल, नोटबु, पेन, कॅल्क्युलेटर, एक मोटार व पाच हजार 850 रूपयांची रोकड असा एकूण 24 लाख 27 हजार 950 रूपयांचा मुद्देमाल ज्त केला. याप्रकरणी आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल असून

अधिक तपास सुरू आहे. ही कारवाई वरिष्ठ निरिक्षक मिलिंद वाघमारे, निरीक्षक राजेंद्र निकाळजे, उपनिरिक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *