फ्लॅटचा ताबा न देता फसवणूक करणार्या बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा
Pckhabar- फ्लॅटसाठी बुकींग करून वेळेत ताबा न देता ग्राहकाकडून पैसे घेतले. पैसे परत मागिल्यानंतरही पैसे दिले नाहीत, त्यामुळे तीन बांधकाम व्यावसायिकांवर वाकड पोलीस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी संदिप काशिनाथ कर्डिले (वय-37, रा. महादेव कॉलनी, थेरगाव) आणि विशाल संपत खुडे (वय-38, रा. रेणुनगर, वाकड) यांनी स्वतंत्र फिर्याद दिली आहे. त्यानुसार मेसर्स साई कन्ट्रक्शनचे भागीदार शैलेश चांगदेव लांडे (वय-31), पंकज नामदेव रानवडे (वय-30), प्रदिप के. भोसले (वय-37, तिघेही रा. कासारवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बांधकाम व्यावसायिक असून त्यांचा मेसर्स साई कन्ट्रक्शन नावाने व्यवसाय आहे. फिर्यादी खुडे आणि कर्डिले यांनी आरोपींच्या थेरगाव, लक्ष्मीबाई बारणे उद्यानाजवळ बांधकाम प्रकल्पामध्ये फ्ॅलटचे बुकिंग केले होते. खुडे यांनी 101 या नंबरचा फ्लॅट बुककरून त्यासाठी 28 लाख 80 हजार रूपये आरोपींना दिले होते. तर कर्डिले यांनी 301 हा फ्ॅलट बुक केला होता. त्यासाठी त्यांनी 30 लाख रूपये आरोपींना दिले होते. मात्र, आरोपींनी बिल्डींगचे काम अर्धवट करून फ्लॅटचा ताबा दिला नाही. फिर्यादी यांनी आरोपींकडे पैशांची मागणी केल्यानंतर त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे फिर्यादी खुडे आणि कर्डिले यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपींवर कलम 406, 417, 418, 420, 34, 120 (ब) महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अॅक्ट 1963 चे कलम 13 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
वाकड पोलिस तपास करत आहेत.










Leave a Reply