Pimpri corona News: शहरात आज 1151 नवे रुग्ण, 1250 जणांना डिस्चार्ज तर 65 मृत्यू झाल्याची नोंद
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 1151 नवीन रुग्णांची आज (शनिवारी) भर पडली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 75 हजार 267 वर पोहोचली आहे. नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्याही आज जास्त आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 1250 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 65 मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
शहरात आजपर्यंत 75 हजार 267 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 61 हजार 870 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1265 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 467 अशा 1732 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 4773 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.
शहरातील 36 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 29 अशा 65 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. शहरातील 36 मृतरुग्णांपैकी चोवीस तासात 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, यापूर्वी परंतु मृत्यू झालेल्या आज अहवाल प्राप्त झालेले 25 मृत्यू आहेत. सलग दुसऱ्या दिवशी कोरोना मृत्यूच्या संख्येत वाढ झाली. वाढत्या मृत्यूमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. त्यात निगडी, काळेवाडी, चिंचवड, पिंपरी, दिघी, कासारवाडी, चिखली, पिंपळेगुरव, भोसरी, मोशी, आकुर्डी, सांगवी, नेहरूनगर, च-होली, रावेत, संत तुकारामनगर, जुन्नर, धायरी, चाकण, धनकवडी, वडगांवशेरी, हडपसर, आंबेगाव, देहूरोड, शिवणे, पाषाण, येरवडा, पुणे, धानोरी, बोपोडी, वाघोली, माळवाडी येथील रुग्णांचा मृत्यु झाला आहे.










Leave a Reply