Pimpri corona news: आपल्या भागात कोरोनाचे किती ॲक्टीव्ह रुग्ण?
Pckhabar- पिंपरी-चिंचवड पालिकेच्या ‘ब’ प्रभागाच्या रावेत, किवळे-विकासनगर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड हद्दीत कोरोनाचे सर्वाधिक म्हणजेच 1483 सक्रिय रुग्ण आहेत. त्याखालोखाल ‘इ’ क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीतील भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघी या भागात कोरोनाचे 1459 सक्रिय रुग्ण आहेत. हे दोनही प्रभाग कोरोना हॉटस्पॉट आहेत.
क्षेत्रीय कार्यालयानिहाय सक्रिय रुग्ण संख्या!
‘अ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संभाजीनगर, मोहननगर, आनंदनगर, चिंचवडस्टेशन, आकुर्डी, प्राधिकरण, आनंदनगर, भाटनगर भागात 895 सक्रिय रुग्ण आहेत.
‘ब’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या रावेत, किवळे-विकासनगर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड प्रभागात सर्वाधिक म्हणजेच 1483 सक्रिय रुग्ण आहेत.
‘क’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा, बोऱ्हाडेवाडी, धावडेवस्ती, इंद्रायणीनगर भागात सर्वात कमी म्हणजेच कोरोनाचे 488 रुग्ण आहेत.
‘ड’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या वाकड, पिंपळेनिलख, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव भागात कोरोनाचे 594 सक्रिय रुग्ण आहेत.
‘इ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघी भागात 1459 रुग्ण आहेत. च-होली, दिघी भागातील रुग्णांची संख्या जास्त आहे. प्रभागातील रुग्णसंख्या तीन हजाराच्या पुढे गेली होती. आता नियंत्रणात येत आहे.
‘फ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या चिखली, कृष्णानगर, तळवडे-रुपीनगर, यमुनागनर, निगडी गावठाण, सेक्टर क्रमांक 22 या प्रभागात कोरोनाचे 964 रुग्ण आहेत.
‘ग’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या पिंपरीगाव, थेरगाव, गणेशनगर, रहाटणी भागात कोरोनाचे 907 सक्रिय रुग्ण आहेत.
‘ह’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संत तुकारामनगर, महात्माफुलेनगर, दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, नवी सांगवी, सांगवी भागात कोरोनाचे 618 सक्रिय रुग्ण आहेत. एकूण 7408 सक्रिय रुग्णांवर कोविड केअर सेंटर, महापालिका, खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.










Leave a Reply