pimpri News : शहरात कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 70 दिवसांवर -आयुक्त श्रावण हर्डीकर
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 38 दिवसांवर खाली आला होता. आता 38 दिवसांवरून 70 दिवसांवर गेला आहे. आता 70 दिवसांनी रुग्णांची संख्या दुप्पट होत असल्याची माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या 75 हजाराच्या उंबरठ्यावर आहे. शहरात सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. शहरात कालपर्यंत 74 हजार 116 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 60 हजार 764 जणांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे. सध्या तर, 13 हजार 352 सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील 1229 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 438 अशा 1667 जणांचा कालपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, शहरातील कोरोनाचे रुग्ण दुपटीचा कालावधी 38 दिवसांवर खाली आला होता. आता 38 दिवसांवरून 70 दिवसांवर गेला आहे. जुलै महिन्यात 11 दिवसांनी रुग्ण दुप्पट होत होते. ऑगस्टमध्ये वाढत वाढत 15 ते 20 दिवसांपर्यंत गेला होता. सप्टेंबरच्या सुरुवातीला 40 दिवसांवर गेला होता. पुन्हा तो 38 दिवसांवर झाला होता. आता सप्टेंबर अखेरला तो 70 दिवसांवर गेला आहे. आजपासून पुढील 70 दिवसांनी रुग्ण दुप्पट होतील. सध्या दिवसाला चार ते साडेचार हजार चाचण्या केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.










Leave a Reply