Pimpri corona News : शहरात आज 856 नवे रुग्ण, 1318 जणांना डिस्चार्ज तर 49 मृत्यू

Pimpri corona News : शहरात आज 856 नवे रुग्ण, 1318 जणांना डिस्चार्ज तर 49 मृत्यू
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आज जास्त आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 1318 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहराच्या विविध भागातील 856 नवीन रुग्णांची भर पडली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 74 हजार 116 वर पोहोचली आहे. आज 49 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

शहरात आजपर्यंत 74 हजार 116 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 60 हजार 764 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1229 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 438 अशा 1667 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 4829 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

शहरातील 23 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 26 अशा 49 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. शहरातील 23 मृतरुग्णांपैकी चोवीस तासात 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, यापूर्वी परंतु मृत्यू झालेल्या आज अहवाल प्राप्त झालेले 20 मृत्यू आहेत. त्यात च-होली, रहाटनी, नेहरूनगर, मोशी, खराळवाडी, वाकड, पिंपळेगुरव, थेरगाव, काळेवाडी, दिघी, देहूरोड, चिंचवड, कुदळवाडी, भोसरी, आकुर्डी, निगडी, पिंपळेनिलख, शिवणे, सिंहगडरोड, चाकण, आंबेगाव, धायरी, खेड, सोमाटने फाटा, कोल्हापूर, सातारा, लोणीकंद, शिरूर, नारायणगाव, बालेवाडी, कात्रज, जुन्नर, खडकीबाजार
येथील रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *