Hinjewadi Crime News : कार्यालयातच सहायक पोलीस निरीक्षकाला मारहाण; दोघांना अटक

Hinjewadi Crime News : कार्यालयातच सहायक पोलीस निरीक्षकाला मारहाण; दोघांना अटक
Pckhabar- मोटारीवर कारवाई केल्यामुळे शासकीय कार्यालयात घेऊन गोंधळ घालत सहायक पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की करून हाताने मारहाण केली. तसेच त्यांना शिवीगाळ करत जमिनीवर ढकलून धमकी दिली. हा प्रकार हिंजवडी वाहतूक शाखेच्या कार्यालयात गुरूवारी घडला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
संतोष शंकर मंजुळकर (वय-41, रा. पाषाण), उदराम डगलाराम घाची (वय-38, रा. बालेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक उमेश नानासाहेब लोंढे (वय-42) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हिंजवडी येथे शासकीय कर्तव्य बजावत होते. त्यावेळी त्यांनी आरोपीच्या मोटारीवर कारवाई केली. यामुळे चिडलेल्या आरोपींनी कारवाईवर आक्षेप घेऊन फिर्यादी यांना आरडा-ओरड करत शिवीगाळ केली. त्यांना धक्काबुक्की करत हाताने मारहाण करून खाली पाडले. धमकी देऊन सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. फौजदार गभाले तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *