Pimpri News : कोरोनामुळे दोन सख्या भावाचा महिन्याभरात मृत्यू
राष्ट्रवादीचे व्यापारी सेलचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांचे कोरोनाने निधन
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे व्यापारी सेलचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड (वय 58) यांचे शुक्रवारी कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
दरम्यान, महिन्यापुर्वीच त्यांचे थोरले बंधू आणि अंध विद्यार्थ्यांचा आश्रम चालविणारे आप्पा गायकवाड यांचेही कोरोनामुळे निधन झाले. महिन्याभरात दोन भावांचे निधन झाल्याने गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
राष्ट्रवादीचे शहरातील एक अत्यंत कार्यक्षम, धाडसी कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. पक्षातील विविध उपक्रम राबविण्याची तसेच संघटनात्मक बांधणीची जबाबदारी त्यांच्याकडे होती.
पंधरा दिवसांपूर्वी प्रदीप गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
Pimpri News : कोरोनामुळे दोन सख्या भावाचा महिन्याभरात मृत्यू










Leave a Reply