Pawana dam news: पिंपरी-चिंचवडकरांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला!
Pckhabar-पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण सप्टेंबरअखेर काटोकाट भरले आहे. धरणात 99.70 टक्के पाणीसाठा आहे. यामुळे पुढील वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. 1 जूनपासून धरण क्षेत्रात 1684 मिली मीटर पावसाची नोंद झाली.
पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. यंदा पावसाने ओढ दिली होती. जून, जुलैमध्ये धरण क्षेत्रात पाऊस पडला नव्हता. त्यामुळे पाण्याचे संकट येण्याची चिन्हे होती. पण, ऑगस्टमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. ऑगस्टअखेर पवना धरण शंभर टक्के भरले होते. आजमितीला धरणात 99.70 टक्के पाणीसाठा आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणातील येवा सुरूच आहे. 1 जूनपासून धरण क्षेत्रात 1684 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. 64.71 टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. आजमितील धरणात 99.70 टक्के पाणीसाठा आहे. पुढील वर्षभर पुरेल एवढा हा साठा आहे. त्यामुळे पाण्याची चिंता संपली आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 3817 मिली मीटर पाऊस झाला होता.
दरम्यान, धरण 100 टक्के भरले असले. तरी, देखील शहरवासीयांना अनिश्चित काळासाठी दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागणार आहे. जोपर्यंत 30 एमएलडी अतिरिक्त पाणी मिळत नाही. तोपर्यंत एकदिवसाआड पाणीपुरवठा कायम राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.










Leave a Reply