Khadki News : खडकी कॅन्टोन्मेट परिसरात कोरोना नियंत्रणात

Khadki News : खडकी कॅन्टोन्मेट परिसरात कोरोना नियंत्रणात
Pckhabar- कॅन्टोन्मेट बोर्ड प्रशासन, रुग्णालय विभाग, तसेच आरोग्य विभाग, यांच्या वतिने सामुहिकरित्या सुनियोजित पध्दतीने राबविल्या जात असलेल्या उपाय योजनामुळे खडकी कॅन्टोन्मेट परिसरात लवकरच कोरोना नियंत्रणात येणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

कॅन्टोन्मेट परिसरात एकुण 1452 रुग्णांची नोंद असुन त्यातील 1290 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या परिसरात 126 रुग्ण असुन कॅन्टोन्मेट रुग्णालयासह  पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णालयात हे सर्व रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती कँन्टोन्मेंट प्रशासनाच्या वतिने देण्यात आली. कँन्टोन्मेंट परिसरात रुग्ण बरे होण्याचा दर 90 टक्के असुन म्रुत्यु दर अडीच टक्के ईतका अल्प स्वरुपाचा असा आहे. मागील दहा दिवसात साधारणपणे 49 रुग्ण आढळले असुन या कालावधित एक ही रुग्ण दगावला नाही ही कँन्टोन्मेंट प्रशासन तसेच खडकीकरांसाठी समाधानकारक बाब मानली जात आहे.

कोरोना रुग्ण संख्या कमी होत असल्याने जिजामाता शाळेतील एक कोविड केअर सेंटर तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याची माहिती कँन्टोन्मेंट बोर्डाच्या वतिने देण्यात आली. पुणे जिल्हाधिकारी प्रशासनाच्या वतिने दोन हजार अँन्टीजेन किट रँपिड टेस्टींग करीता नुकत्याच दिल्या असल्याचे ही बोर्ड प्रशासनाच्या वतिने सांगण्यात आले.

कॅन्टोन्मेट रुग्णालाय, आरोग्य विभाग व प्रशासन यांच्या वतीने  कोरोना आटोक्यात आणण्याकामी केल्या जात असलेल्या सुनियोजित पध्दतीच्या उपाययोजना मुळे लवकरच खडकी कँन्टोन्मेंट परिसर कोरोनामुक्त होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तरी नागरिकांनी गाफिल न राहता प्रशासनाने सुचित केलेल्या सर्व नियम व कायद्याचे पालन करुन खडकी परिसर कोरोनामुक्त करण्याकामी सहकार्य करावे असे आवाहन कँन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतिने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *