Charholi news: च-होली, वडमुखवाडी, चोविसावाडीत आजपासून तीन दिवस जनता कर्फ्यू

Charholi news: च-होली, वडमुखवाडी, चोविसावाडीत आजपासून तीन दिवस जनता कर्फ्यू

Pckhabar- च-होली, वडमुखवाडी, चोविसावाडी या ग्रामीण भागातील कोरोनाचा साखळी तोडण्यासाठी ग्रामस्थांनी आजपासून शनिवारपर्यंत जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. मेडिकल दुकाने वगळून तीन दिवस संपूर्ण व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत.

च-होली, वडमुखवाडी, चोविसावाडी या ग्रामीण भागातही कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सुरुवातीपासून या भागात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत.
आजपर्यंत सुमारे 500 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सक्रिय रुग्णांचेही प्रमाण अधिक आहे.

कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी च-होली, वडमुखवाडी, चोविसावाडीत आजपासून तीन दिवस शनिवारपर्यंत कडकडीत बंद असणार आहे. या काळात फक्त मेडिकल दुकाने सुरू राहणार आहेत. इतर सर्व दुकाने, व्यवसाय, दूध विक्री, भाजीपाला विक्री बंद राहणार आहे. बंदमध्ये शिस्तीचे उल्लंघन केल्यास कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. दिवसाला एक हजार ते बाराशे नवीन रुग्णांची भर पडत आहे. शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 72 हजार 476 वर पोहोचली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *