Pimpri News : वायसीएम रूग्णालयात इतर आजारावर उपचार सुरू करा

Pimpri News : वायसीएम रूग्णालयात इतर आजारावर उपचार सुरू करा
Pckhabar- यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय हे कोविड सेंटर म्हणुन जाहीर करण्यात आले. त्यामुळे इतर आजारावरील रुग्णांना उपचार व शस्त्रक्रियेसाठी मोठी गैरसोय होत आहे. खासगी रुग्णालयाचे उपचार सर्वसामान्य नागरिकांना परवडत नाहीत. त्यामुळे वायसीएम रूग्णालयात इतर आजारावरील उपचार आणि शस्त्रक्रिया सुरू कराव्यात, अशी मागणी मनसे चित्रपट सेनेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष दत्ता घुले, उपाध्यक्ष तुकाराम शिंदे यांनी केली आहे.

याबाबत घुले आणि शिंदे यांनी वायसीएम रूग्णालयाचे मुख्य डॉ. राजेश वाबळे यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, 3 एप्रिल 2020 पासुन यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय हे कोविड सेंटर म्हणुन जाहीर करण्यात आले. त्यामुळे इतर आजारावरील रुग्णांना उपचार व शस्त्रक्रियेसाठी मोठी गैरसोय होत आहे. खासगी रुग्णालयाचे उपचार सर्वसामान्य नागरिकांना परवडत नाहीत. तथापि, अनेक गोरगरीब नागरिकांच्या शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत. त्यामुळे वायसीएम रूग्णालयात  इतर आजारावरील उपचारासाठी एक स्वतंत्र
व्यवस्था करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष दत्ता घुले, उपाध्यक्ष तुकाराम शिंदे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *