Article : भारतात साडेसहा कोटी पेक्षा अधिक कोरोना चाचण्या पूर्ण : डॉ. अंकुश जाधव

भारतात साडेसहा कोटी पेक्षा अधिक कोरोना चाचण्या पूर्ण : डॉ. अंकुश जाधव
Pckhabar- कोरोना हा मुळात प्राणी जगतातून माणसाकडे आलेला विषाणू आहे. याचे रुग्ण जगात प्रथम चीनच्या वूहान प्रांतात आढळून आले. कोरोनाचा पहिला रुग्ण भारतात ३०जानेवारीला केरळ राज्यात आढळून आला.

(२३सप्टेंबर सायं.६वाजता) जगात एकूण ३ कोटी १८ लाख लोक कोरोनाबाधित असून २कोटी ३४ हजार कोरोना मुक्त झाले आहेत. ७४ लाख २२ हजार उपचाराधीन आहेत. त्यापैकी ७ लाख ३६ हजार लोकांना साधारण, सौम्य लक्षणे आहेत तर १ टक्का लोक गंभीर अवस्थेत आहेत. भारतात जवळ जवळ ५६ लाख ४६ हजार रकोरोनाबाधित असून त्यापैकी ४५ लाख ८७ हजार बरे झालेले आहेत तर जवळ जवळ १०लाख उपचाराधीन आहेत. एकूण मृत्यू ९० हजारहून अधिक झालेले आहेत.

वाढत्या लोकसंख्ये च्या बाबतीत जगात चीन नंतर भारताचा नंबर लागतो. भारताची लोकसंख्या जवळ जवळ १३५ कोटीच्या दरम्यान आहे. भारतात प्रति चौ. कि. मी.मध्ये ४०५ लोक राहतात तर भारता पेक्षा क्षेत्रफळाने मोठ्या असलेल्या अमेरीकेत प्रति चौ. कि.मी.४० लोक राहतात. अमेरिकेची लोकसंख्या ३३ ते ३५ कोटीच्या दरम्यान आहे . अमेरिकेत आता ७० लाख ९८ हजार कोरोनाबाधित आहेत. दोन्ही देशांच्या लोकसंख्येच्या घनते चा विचार केला तर आज भारतात ७ कोटींपेक्षा अधिक लोक कोरोनाबाधित असाला हवे होते. परंतु प्रत्यक्षात ५६ लाखच आहेत. अमेरिका भारता पेक्षा पुढारलेला देश मानला जातो.

कोणताही रोग निश्चित करण्यासाठी जी तपासणी केली जाते, त्यास चाचणी(टेस्ट) असे म्हणतात. कोरोना हा आजार झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी सुद्धा चाचणी केली जाते.
डिसेंबर मध्ये कोरोना जेव्हा समजला तेव्हा भारतात चाचण्यांसहित सर्वच सुविधा मर्यादित होत्या. कोरोनाच्या आजाराची निश्चिती करण्यासाठी मार्च महिन्यात भारतात दिवसाला फक्त ३०० चाचण्या केल्या जात होत्या. भारताने ही चाचण्याची संख्या हळू हळू वाढविली व २२ एप्रिल रोजी ५ लाख तर ३ मे ला १० लाख चाचण्या केल्या. १७ ऑगस्ट रोजी ३ कोटी चाचण्या पूर्ण केल्या म्हणजेच ३ मे नंतर १७ ऑगस्ट या साधारणतः १०५ दिवसात २ कोटी ९० लाख चाचण्या पूर्ण केल्या तर २१ सप्टेंबर रोजी ६ कोटी ५३ लाखापेक्षा अधिक चाचण्या पूर्ण केल्या. आज २३ सप्टेंबर सायं. पर्यंत६ कोटी ६२ लाख चाचण्या पूर्ण केल्या असून येत्या ४/५दिवसात ७ कोटी होतील. भारताने युद्ध पातळीवर प्रयत्न करून कोरोना चाचण्याचा वेग वाढविला. चाचण्या वाढल्या की रुग्णा ची संख्या वाढत जाणार हे निश्चित. अमेरिकेत आतापर्यंत १० कोटी , ब्राजील मध्ये १कोटी ५०लाख तर रशियात ४ कोटी ३६ लाख कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत.
आता ४ थ्या अनलॉक मध्ये कोरोना बधितांची संख्या वाढत आहे. कारण चाचण्या ची संख्या वाढली आहे. सध्या Antigen व RT PCR या दोन्ही चाचण्या कोरोनाचे निदान करण्यासाठी अधिकृत म्हणून मानल्या जातात.Antigen चाचणीचा रिपोर्ट एका तासात मिळतो तर RT PCR चाचणीचा रिपोर्ट मिळण्यास साधारण २४ तास लागतात. Antigen चाचणीचा रिपोर्ट सकारात्मक(पॉझिटिव्ह) आल्यास रुग्णास कोरोना वा कोविड-१९ आहे असे समजण्यात येते परंतु लक्षणे असूनही तो नकारात्मक (निगेटिव्ह) आल्यास त्याची RT PCR टेस्ट करणे आवश्यक असते. बरेच वेळा संसर्ग असून सुद्धा Antigen चाचणी ही निगेटिव्ह येण्याची शक्यता सुमारे ५० टक्के असते तर हेच RT PCR चाचणी बाबतीत सुद्धा ३०टक्के दिसून येते. अशा वेळी सर्व लक्षणे दिसत असून ही या चाचण्या निगेटिव्ह आल्यास रुग्णाचा CT Scan म्हणजेच HRCT Chest केला जातो. यावरून संसर्गाचा अंदाज येऊ शकतो.ही चाचणी अन्य देशात केली जाते परंतु भारतात या चाचणी बरोबरच Antigen वा RT PCR या पैकी कोणत्याही चाचणीचा रिपोर्ट कोरोना च्या निदानासाठी सकारात्मक(पॉझिटिव्ह) असावा लागतो.
आता कोरोना संसर्गाचे निदान करण्यासाठी “फेलुदा’ नावाची चाचणी टाटा समूह व सी एसआयआर(CSIR)च्या रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स अँड इंटेग्रेटिव्ह बायोलॉजि या संस्थांनी संयुक्तरित्या ही चाचणी विकसित केली असून या चाचणीची अचूकता RT PCR या चाचणी इतकीच असून ही कमी वेळेत व खर्चात करता येते. या चाचणीला “फेलुदा” हे नाव प्रख्यात दिग्दर्शक व लेखक सत्यजीत यांच्या कादंबऱ्या मधील गुप्तहेर असलेल्या पात्रावरून दिले आहे.
टाटा सन्सच्या सहकार्याने”किस्पर कॅश” ही जगातील पहिली कागदावर आधारित चाचणी ही विकसित करण्यात आली आहे, असे वैज्ञानिक व औधोगिक संशोधन परिषदचे(CSIR) महासंचालक डॉ.शेखर मांडे यांनी नुकतेच पुणे येथे सांगितले.
सर्वाधिक लोकसंख्या व सामाजिक जीवनमान तुलनेने खालावलेले असलेल्या भारतात कोरोनाचा फैलाव वेगाने व मोठया प्रमाणात होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु सुदैवाने असे घडले नाही. भारतात जगातील अन्य देशांच्या तुलनेने कोरोनाचा प्रादुर्भाव व मृत्यू निश्चित कमी आहे.

कोरोना अर्थात कोविड-१९ या महासाथीचे जागतिक संकट असून ते या जगातून लवकर हद्दपार होणार नाही,हे निश्चित झाल्यानेजागतिकआरोग्यसंघटनेआता कोरोना बरोबरच जगायला शिका असे सांगितले आहे.
कोरोनाने जगात किती ही हातपाय पसरले तरी ते भारतात रोखले गेलेत जातील. मुळात पाश्चिमात्य व विकसित देशांसारखी स्थिती भारतात येणार नाही. कारण त्यांच्या आणि भारताच्या परिस्थितीतच मूलभूत फरक आहे.

१)भारतीयांची रोगप्रतिकारक शक्ती अन्य देशातील लोकांपेक्षा निश्चित, नैसर्गिकरित्याच चांगली आहे. हे आता दिसून आले आहे.

२)भारतीयांच्या आहारात वैविध्य आहे.हे वैविध्यच कोरोनाच्या प्रसाराला प्रतिबंध करणारे आहे.

३) भारतात बहुसंख्य लोक संमिश्र आहार घेणार आहेत.

४) भारतातील नैसर्गिक वातावरणच असे आहे की, जे कोरोनाच्या प्रसाराला प्रतिबंध करु शकते.

५)भारताला परंपरागत संस्कृती व आहाराचा वारसा लाभला आहे.

६) इन्स्टंट, चायनीज, मसालेदार इ.पदार्थांचे प्रमाण गेल्या २०/२५ वर्षात वाढले आहे, जे पूर्वी इतके नव्हते.
७) भारतात स्वच्छता व अस्वच्छता यांचा संगम आहे.
सरकारी नियमांचे पालन करा.
“स्वतःबरोबरच कुटुंबाची काळजी घ्या.”
“माझे कुटुंब ,माझी जबाबदारी” माना.

डॉ. अंकुश जाधव
माजी सहायक संचालक(वैज्ञानिक-४), केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, आयुष मंत्रालय, भारत सरकार.
नवी मुंबई, इस्लामपूर(सांगली)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *