Hinjewadi Crime News : हिंजवडी आयटी पार्कमध्ये 25 किलो गांजा जप्त

Hinjewadi Crime News : हिंजवडी आयटी पार्कमध्ये 25 किलो गांजा जप्त

Pckhabar- पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने हिंजवडी फेज दोन येथे सापळा लावून एका तरुणाला अटक केली. तो तरुण गांजा विक्रीसाठी हिंजवडी येथे आला होता. त्यांच्याकडून पोलिसांनी 6 लाख 40 हजार 150 रुपये किमतीचा 25 किलो 606 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

योगेश्वर गजानन फाटे (वय 23, रा. जनवाडी, जनता वसाहत, गोखलेनगर पुणे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

सहाय्यक पोलीस फौजदार शाकिर जिनेडी यांना एक इसम गांजा विक्री करण्यासाठी हिंजवडी येथील राजीव गांधी आयटी पार्क फेज दोन, बोडकेवाडी येथे एका कंपनीच्या संरक्षक भिंतीजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन अंमली पदार्थ विरोधी पथकाने परिसरात सापळा लावला.

योगेश्वर फाटे कंपनीच्या संरक्षक भिंतीजवळ आला. त्यावेळी पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडे असलेल्या पोत्यासारख्या पिशवीची झडती घेतली असता त्यात 6 लाख 40 हजार 150 रुपयांचा 25 किलो 606 ग्रॅम गांजा आढळून आला. त्याने हा गांजा विक्रीसाठी आणला असल्याची आरोपीने कबुली दिली आहे. त्यावरून त्याला अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *