Pimpri corona News: शहरात आज 872 नवे रुग्ण, 557 जणांना डिस्चार्ज तर 16 मृत्यू
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 835 आणि पालिका हद्दीबाहेरील 37 अशा 872 नवीन रुग्णांची आज (बुधवारी) भर पडली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 72 हजार 476 वर पोहोचली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 557 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरात आजपर्यंत 72 हजार 476 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 58 हजार 396 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1190 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 398 अशा 1558 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 5197 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.
शहरातील 15 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 1 अशा 16 रुग्णांचा मृत्यू झाल्याची आज नोंद झाली आहे. त्यात
पिंपळेगुरव, पिंपळेसौदागर, काळेवाडी, आकुर्डी, चिखली, चिंचवड, वाकड, रहाटनी, संत तुकारामनगर, पिंपरी, देहूरोड येथील रुग्णांचा मृत्यु झाला आहे.










Leave a Reply