Pckhabar- ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या शासनाच्या योजनेतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत कोरोना रॅपिड अँटिजेन चाचणीचाचणी उद्या (गुरुवार) संपूर्ण तळेगावात शहराच्या हद्दीत राबविण्यात येणार आहे. एक दिवसाचा संपूर्ण लॉकडाऊन असेल अशी माहिती मावळ-मुळशीचे प्रांत संदेश शिर्के यांनी दिली.
तळेगाव दाभाडे नगरपरिषद सभागृहामध्ये झालेल्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, तळेगावच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, मुख्याधिकारी रवी पवार, वैद्यकीय अधिकारी गुनेश बागडे, उपमुख्यधिकारी सुप्रिया शिंदेसह नगरपरिषदेतील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये राबवण्यात येणार्या अॅटीजेन टेस्ट बाबतच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. याबाबत संपूर्ण तळेगावातील 13 प्रभागांमध्ये पूर्ण नियोजन झाले असून तळेगावातील चार ठिकाणी तपासणी केंद्र उभारण्यात येणार आहे. प्रत्येक भागामध्ये प्रत्येक प्रभागांमध्ये दोन लॅब टेक्निशन, वैद्यकीय अधिकारी, स्वयंसेवक यांची नेमणूक केली आहे.
तपासणी कारणार्या स्वयंसेवकास नागरिकांमध्ये कोरोना विषाणू असल्याची लक्षणे आढळल्यास त्याची तपासणी गाव भागामध्ये कन्या शाळा, नगरपरिषद क्रीडा संकुल, तर स्टेशन भागामध्ये नवीन समर्थ विद्यालय, संत ज्ञानेश्वर शाळा याठिकाणी सदर लक्षणे आढळणार्या नागरिकाची अंतिजन टेस्ट होणार आहे.
ज्या शासकीय कर्मचार्यावर या अॅटीजेन टेस्ट सर्व्हे मध्ये कामाची जबाबदारी सोपवलेली आहे. त्यांनी जर कामचुकारपणा केला. तर त्याची गय केली जाणार नाही. अशी तंबी तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली. सर्व नागरिकांनी या अंटीजेन टेस्ट सर्वेसाठी व एक दिवसाच्या लॉकडाऊन सहकार्य करावे. तसेच या दिवसाच्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये दुध, मेडिकल, दवाखाने चालू राहतील असे मावळ मुळशीचे प्रांत संदेश शिर्के यांनी सांगितले.










Leave a Reply