Lonavala News : मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यत पोलीस भरती थांबवा
Pckhabar- मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यत पोलीस भरती करू नये अशी मागणी सकल मराठा समाज मावळ च्या वतीने आज करण्यात आली. लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात सदर मागणीचे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले.
यामध्ये मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाला मा. सर्वोच्च न्यायालयात स्थगिती देण्यात आली आहे. ती स्थगिती उठविण्यासाठी व समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या कायदेशीर बाबींची पुर्तता करावी. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यत पोलीस भरती थांबवावी, मराठा क्रांती मोर्चाच्यावेळी मराठा समाज बांधवांवर जे गुन्हे दाखल दाखल करण्यात आले होते ते तात्काळ मागे घेण्यात यावे. आमच्या कोपर्डी येथील भगिनींवर अत्याचार करणार्यांना कडक शासन करा. आंदोलनामध्ये शहिद झालेले व त्यांच्या वारसांना शासकीय नोकरी, कुटुंबांना पेन्शन व स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा देण्यात यावा. समाजाच्या या मागण्या मान्य न झाल्यास सकल मराठा समाजाला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही व यानंतर होणार्या परिणामांना सर्वस्वी शासन जबाबदार राहिल असे निवेदनात म्हंटले आहे.
कोरोना संक्रमणांची स्थिती ध्यानात घेता सकल मराठा समाजाच्या वतीने प्रातिनिधिक स्वरुपात डॉ. किरण गायकवाड, नरेंद्र पाळेकर, अरुण लाड, उमेश तारे, भारत चिकणे, भरत भरणे, बाबाजी कुटे, संतोष येवले, नारायण पाळेकर, रुपेश नांदवटे, संभाजी तिकोणे, दत्ता गोसावी आदींनी ही निवेदने दिली.
Lonavala News : मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यत पोलीस भरती थांबवा










Leave a Reply