मायमर वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ.दिलीप भोेगे यांचे निधन

मायमर वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ.दिलीप भोेगे यांचे निधन
Pckhabar- माईर्स एमआयटी, पुणेचे एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयाचे औषध वैद्यकशास्त्र (मेडिसीन) विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. दिलीप भोगे यांचे कोरोना मुळे में बुधवारी निधन झाले. ते. 65 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.
त्यांना माईर्स एमआयटीचे संस्थापक व प्रमुख प्रा.डॉ. विश्वनाथ दा.कराड, मायमर वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. सुरेश घैसास, कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड-नागरे,  आणि संचालक डॉ. विरेंद्र घैसास यांनी भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली. तसेच त्यांच्या आत्मास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना केली.
डॉ. भोगे हे एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेपासून जुळलेले होते. कोविड 19 च्या काळात त्यांचे रूग्णसेवेतील योगदान अमूल्य होते. मावळ तालुक्यातील जवळपास सर्व कोविड सेंटर निर्मितीमध्ये त्यांचे मोलाचे मार्गदर्शन होते. ते वैद्यकीय शिक्षण आणि रुग्णसेवा बरोबरच इतर सामाजिक कार्यामध्ये ही भाग घेत असत.
डॉ. भोगे यांनी एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक व विभागप्रमुख या जवाबदारी बरोबरच तळेगाव जनरल हॉस्पिटल अँड कॉन्व्हेलस्नट होम या संस्थेचे मानद वैद्यकीय अधिक्षक, इंडियन मेडिकल असोसिएशन, तळेगावचे माजी अध्यक्ष आणि मावळ डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष पदावर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *