Dehu News : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वयंसेवकांचा सहभाग

Dehu News : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वयंसेवकांचा सहभाग

Pckhabar- देहू आणि संपूर्ण परिसरात राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 50 स्वयंसेवकांनी सहभाग घेत प्रशासनाला सहकार्य केले, अशी माहिती देहूगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश हगवणे यांनी दिली.

देहूगाव, विठ्ठलवाडी, माळवाडी, बोडकेवाडी, वडाचा माळ या भागात 130 आरोग्य पथकाच्या मार्फत ही मोहिम राबविण्यात आली.

संशयित रुग्णांची प्राथमिक आरोग्य केंद्र देहू, प्राथमिक शाळा विठ्ठलवाडी, प्राथमिक शाळा माळवाडी येथे 146 संशयित रुग्णांची ॲटीजेन तपासणी करण्यात आली. यामध्ये 55 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

राज्यात आणि देशात कोरोनाने थैमान घातले असताना कोणतीही चिंता न करता फक्त जबाबदारी म्हणून कार्यकर्ते काम करत होते, या सर्वांचे हगवणे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *