Dehu News : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेला जिल्हा परिषद सदस्या शैला खंडागळे यांचे सहकार्य
Pckhabar- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम देहूगाव येथे मंगळवारी राबविण्यात आली. या मोहिमेला पुणे जिल्हा परिषद सदस्या शैला खंडागळे यांनी सहकार्य केले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देहूगाव परिसरात राबविण्यात आलेल्या माझे कुटुंब माझी मोहिमेत तब्बल 55 कोरोनाबाधित आढळून आले. देहूमध्ये जिल्हा परिषदेच्या सदस्या शैला खंडागळे
यांच्या उपस्थितीत कुटुंबांचा सर्वे केला. ग्रामस्थांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला.
यावेळी शैला खंडागळे म्हणाल्या, शासनाचे नियम आणि कोविड संबधित जी काही आवश्यक आरोग्य नियमावली आहे, त्याचा काटेकोरपणे पालन करावे.
आपल्याला खऱ्या अर्थाने कोविडला संपवायचे असेल तर सर्वांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही खंडागळे यांनी केले.

देहू, माळवाडी, विठ्ठलवाडी, गंधर्व नगरी, आनि अनेक रहिवाशी सोसायट्यांमध्ये जाऊन सर्वे करण्यात आला. तलाठी भाऊसाहेब, सरपंच, उपसरपंच प्रशासकीय अधिकारी अणि, ग्रामपंचायत सदस्य तसेच आरोग्य अधिकारी, आशा सेवक तसेच इतर सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.










Leave a Reply