Dehu News : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत सापडले तब्बल 55 कोरोनाबाधित
Pckhabar – देहूगाव परिसरात आज मंगळवारी घरोघरी जाऊन ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत तब्बल 55 जण कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील 13 रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत, तर उर्वरित जणांना गृहविलिगीकरण करण्यात आले आहे अशी माहिती देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्ररोग तज्ञ डॉ. किशोर यादव यांनी दिली.
देहूगाव, विठ्ठलवाडी, माळवाडी, बोडकेवाडी, वडाचा माळ या भागात 130 आरोग्य पथकाच्या मार्फत ही मोहिम राबविण्यात आली.
संशयित रुग्णांची प्राथमिक आरोग्य केंद्र देहू, प्राथमिक शाळा विठ्ठलवाडी, प्राथमिक शाळा माळवाडी येथे 146 संशयित रुग्णांची ॲटीजेन तपासणी करण्यात आली. यामध्ये 55 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. मधुमेह असलेले – 7, हृदयरोग – 1, उच्च रक्तदाब असलेले -5 आदी रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, देहूगाव परिसरात नागरिकांनी कर्फ्यू ला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.










Leave a Reply