Pimpri corona News: पिंपरीत आज 832 नवे रुग्ण, 905 जणांना डिस्चार्ज तर 34 मृत्यू
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 814 आणि पालिका हद्दीबाहेरील 18 अशा 832 नवीन रुग्णांची आज (मंगळवारी) भर पडली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 71 हजार 641 वर पोहोचली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 905 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 34 जणांचा मृत्यू झाला आहे.
शहरात आजपर्यंत 71 हजार 641 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 57 हजार 914 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1175 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 397 अशा 1572 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 5188 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.
शहरातील 22 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 12 अशा 34 रुग्णांचा मृत्यू झाल्याची आज नोंद झाली आहे. शहरातील 22 मृतरुग्णांपैकी आज दोन आणि यापूर्वी परंतु आज अहवाल प्राप्त झालेल्या 20 जणांचा समावेश आहे. त्यात चिंचवड, भोसरी, पिंपरी, तळवडे, सांगवी, ताथवडे, पिंपळेनिलख, वाकड, आकुर्डी, मोशी, निगडी, चिखली, रूपीनगर, चाकण, धनकवडी, वारजे, आंबेगाव, सातारा
येथील रुग्णांचा मृत्यु झाला आहे.










Leave a Reply