Chinchwad News : भाजयुमो तर्फे ‘सेवा सप्ताह अभियान’ अंतर्गत रक्तदान शिबिर संपन्न
Pckhabar-भाजपा पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने १४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर सेवा सप्ताह अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने भाजयुमो पिंपरी चिंचवड शहराच्या वतिने भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले. या अभियानात संपूर्ण शहरात ३२१ रक्ताच्या बाटल्यांचे संकलन करण्यात आले.
कोरोनाच्या संकटसमयी देशात आणि राज्यात रक्तचा प्रचंड प्रमाणात तुटवडा जाणवत आहे त्या अनुषंगाने भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजयुमो शहराध्यक्ष संकेत चोंधे यांचे नेतृत्वाखाली शहरात ठिक ठिकाणी सोशल डिसटेंसिंगचे पालन करून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले..
शहरातील मोशी, प्राधिकरण, दिघी, चिखली, त्रिवेणीनगर, आकुर्डी, चिंचवड येथील परिसरात हे अभियान राबवण्यात आले. कोरोनाच्या या संकट काळात देखील नागरिकांनी शिबिरास उदंड प्रतिसाद दिला.
स्थानिक भाजपा नगरसेवक, पीएसआय आणि मोरया या ब्लड बँकेच्या सहकार्याने भाजयुमोचे सचिन बंदी, मिहीर झा, उदय गायकवाड, शिरीष जेधे, सागर घोरपडे, पंकज शर्मा, ऋतिक चव्हाण, भूषण माळी, हेमंत देवकुळे, पूजा आल्हाट, संदीप पाटील, ऋषिकेश भालेकर यांनी हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.










Leave a Reply