Dehu News : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे : डॉ. किशोर यादव

Dehu News : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे : डॉ. किशोर यादव

देहूगाव परिसरात कोरोनाचे 14 नवे रुग्ण, 10 रुग्णांना डिस्चार्ज

Pckhabar – देहूगाव परिसरात आज (मंगळवार) घरोघरी जाऊन ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम राबविण्यात येणार आहे, या मोहिमेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्ररोग तज्ञ डॉ. किशोर यादव यांनी केले आहे.

देहूगाव परिसरात सोमवारी 14 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दहा कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

देहूगाव परिसरात आत्तापर्यंत 643 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आजअखेर 543 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

89 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहे. 24 जणांचे घरगुती विलीनीकरण करण्यात आले आहे. तर तीर्थक्षेत्र देहूगावच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये 47 रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये 53 रूग्णांना लक्षणे नसून 36 रुग्णांना लक्षणे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *