Dehu News : देहूगावात जिल्हा परिषद सदस्या शैलाताई खंडागळे यांच्या उपस्थितीत उद्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम

देहूगावात जिल्हा परिषद सदस्या शैलाताई खंडागळे यांच्या उपस्थितीत उद्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम

Pckhabar- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम पुणे जिल्हा परिषद सदस्या शैलाताई खंडागळे यांच्या उपस्थितीत उद्या (मंगळवार) देहूगाव परिसरात राबविण्यात येणार आहे.

या मोहिमे अंतर्गत खालील तपासणी करण्यात येणार आहे.

#प्राथमिक आरोग्य केंद्र पथकाची घरोघरी भेट.

#घरातील सदत्यांचे Spo2 य तापमान तपासणी

#कोविड सदृश्य लक्षणे असतील त्यांना उपचारासाठी फिव्हर क्लिनिक मध्ये दाखल करणे

#कोमॉट्डि स्थिती असणारे रुग्ण नियमित उपचार घेतात का याची वेळोवेळी खात्री करो, घरातील सदस्यांना आवश्यक माहिती व आरोग्य संदेश देणे.

माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम कोविड-19 साथ नियंत्रणात आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या  तपासणी पथकाला सहकार्य करावे, असे आवाहन पुणे जिल्हा परिषद सदस्या आणि शिवसेनेच्या मावळ महिला आघाडीच्या संघटिका शैलाताई खंडागळे यांनी केले आहे.

देहूगाव परिसरात तीन फ्लू केंद्राची निर्मिती
#प्राथमिक आतेग्य केंद्र देहू
#प्राथमिक शाळा विठ्ठलवाडी
#प्राथमिक शाळा माळवाडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *