Pimpri News : व्यवसायाच्या सुरूवातीच्या दिवसात संयम, निर्णय क्षमता महत्त्वाची : लायन ओमप्रकाश पेठे

व्यवसायाच्या सुरूवातीच्या दिवसात संयम, निर्णय क्षमता महत्त्वाची : लायन ओमप्रकाश पेठे
” व्यवसायाची क्षितिजे ” या विषयावरील ऑनलाईन परिसंवादाला प्रतिसाद

Pckhabar- व्यवसाय सुरू केल्यानंतरचे 1000 दिवस हे अतिशय जोखमीचे असतात. या काळात संयम, निर्णय क्षमता, आलेल्या संकटावर मात करण्याचे धाडस या गोष्टींचा कस लागतो. त्यानंतर भरभराटीचा मार्ग मोकळा होतो, असे मार्गदर्शन शून्यातून विश्व उभारणाऱ्या लायन ओमप्रकाश पेठे यांनी केले.

लायन्स क्लब्स इंटरनॅशनलच्या कौशल्य विकास प्रकल्पांतर्गत लायन्स क्लब ऑफ पूना निगडी व प्रेरणा कौशल्य विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘व्यवसायाची क्षितिजे ‘ या विषयावर ऑनलाईन परिसंवाद नुकताच आयोजित केला होता. त्यावेळी पेठे बोलत होते.

परिसंवादाचे उद्घाटन बांधकाम क्षेत्रातील नावाजलेले उद्योजक लायन हरी नायर यांनी केले. शून्यातून विश्व उभारणाऱ्या लायन ओमप्रकाश पेठे यांनी व्यवसायाच्या संधी उलगडून दाखविल्या .याचबरोबर व्यवसाय करतांना नितीमत्तेने केला पाहिजे यावर अधिक भर दिला. त्यामुळे भीतिमुक्त वातावरणात व्यवसायाची भरभराट होण्याचा मार्ग सुखकर होतो.कुटुंबाचे पाठबळ , कामगारांचा विश्वास , ग्राहकांबरोबर सुसंवाद, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब , सेवा आणि वस्तूंची गुणवत्ता, वाजवी किंमत, वेळेवर पोहोच, किमती आवाक्यात ठेवण्यासाठी परीक्षण व नियंत्रण याबाबींवर त्यांनी सविस्तर चर्चा केली.

नोकरी व व्यवसायाची मानसिकता , गुंतवणुकीचे मार्ग , संकटातून संधीचे मार्ग या विषयांवर उपस्थितांनी केलेल्या प्रश्नांना पेठे यांनी समर्पक उत्तरे दिली .

या परिसंवादात 60 जणांनी भाग घेतला . व्यवसायासंबंधी मार्गदर्शन यापुढेही चालू ठेवावे अशी विनंती उपस्थितांनी केली .
कार्यक्रमाचे आयोजन , नियोजन व सूत्रसंचालन डिस्ट्रिक्ट स्कील डेव्हलपमेंटचे चेअरपर्सन एम जे एफ लायन अशोक येवले यांनी केले. लायन पेठे यांनी नवउद्योजकांना मार्गदर्शन करावे अशी विनंती अध्यक्ष लायन मारुती मुसमाडे यांनी केली व ती लायन पेठेंनी तत्परतेने मान्य केली.
जॉईंट सेक्रेटरी लायन ऋषिकेश मुसमाडे यांनी परिसंवादाचा समारोप केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *