Pimpri corona news: शहरातील कोरोना रुग्णसंख्या 70 हजार पार; आज 749 रुग्णांची नोंद

Pimpri corona news: शहरातील कोरोना रुग्णसंख्या 70 हजार पार; आज 749 रुग्णांची नोंद

Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 749 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (रविवारी) भर पडली आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बधितांची एकूण संख्या 70 हजार 172 झाली आहे. दिवसभरात 11 रुग्णांचा मृत्यू झाला असून 1 हजार 151 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पालिका रुग्णालयात सक्रिय 5 हजार 375 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

आज महापालिका हद्दीतील 8 आणि हद्दीबाहेरील 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे रुग्ण चिखली (पुरुष 64 वर्षे, पुरुष 70 वर्षे), पिंपरी (स्त्री 84 वर्षे), निगडी (पुरुष 43 वर्षे), काळेवाडी (स्त्री 75 वर्षे), चिंचवड (पुरुष 79 वर्षे), भोसरी (पुरुष 78 वर्षे), पिंपळे निलख (पुरुष 69 वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे विश्रांतवाडी (पुरुष 50 वर्षे), धनकवडी (पुरुष 71 वर्षे), जुन्नर (स्त्री 50 वर्षे) येथील रहिवासी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *