Sangavi news: ‘यामुळे’ जावयाने सासूला चपलेने मारले

Sangavi news: ‘यामुळे’ जावयाने सासूला चपलेने मारले

Pckhabar- जुन्या भांडणातून जावयाने सासूला चपलेने मारहाण केल्याची घटना पिंपळेगुरव येथे घडली. शनिवारी (दि. 19) दुपारी साडेचार वाजता घडलेल्या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी 37 वर्षीय जावयाला अटक केली आहे.

याबाबत सासूने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी आणि फिर्यादी महिला हे जावई आणि सासू आहेत. त्यांच्यात मागील काही दिवसांपासून भांडण सुरु होते. त्या भांडणाच्या कारणावरून जावयाने शनिवारी सासरवाडीत येऊन सासूला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. त्यानंतर जावयाने सासूला चपलेने डोक्यावर आणि तोंडावर मारले.

आरोपी जावयाने सिंधी भाषेत सासूला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत जावयावर मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *