न्यूयार्क विद्यापीठातून ओंकार पाटील यांना डॉक्टरेट
Pckhabar- सांगली जिल्ह्यातील सोनाकिरे गावातील ओंकार रमेश पाटील याने नुकतीच अमेरिका, न्यूयार्क येथील स्टेट university new york या विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली आहे.
ओंकार याने बायोमेडिकल इंजिनिअरिंग या विषयावर गेली 7 वर्ष कठोर मेहनत घेत ही डॉक्टरेट मिळवली आहे.ही डॉक्टरेट मिळवण्यासाठी ओंकार पाटील यांनी अपर कष्ट करून ही डॉक्टरेट मिळवली आहे.
ओंकार पाटील यांचे प्राथमिक शिक्षण खेराडे वांगी या छोट्याशा गावात झाले असून माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय कडेगांव येथून झाले आहे. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण कराड येथील एस.जी.एम. या महाविद्यालयात झाले आहे. त्यानंतर ओंकार पाटील यांचे बी.टेक. चे शिक्षण पुण्यातील विश्वकर्मा इन्स्टीट्यूट येथून झाले आहे. त्यांनी इन्सट्रूमेंटेमेशन हा ट्रेड घेऊन बी.टेक चे शिक्षण पूर्ण केले.तिथे शिकत असताना ओंकार पाटील यांना Biomedical instrumentation या विषयामध्ये रस निर्माण झाला.
त्यानंतर ओंकार पाटील 2014 साली एम.एस.ही पदवी मिळवण्यासाठी अमेरिकेतील न्यू यॉर्क या शहरात गेले. तिथे त्यांनी स्टेट युनिव्हर्सिटी, न्यू यॉर्क इथे एडमिशन घेतले. 2016 साली त्यांचे एम.एस.चे शिक्षण पूर्ण झाले.त्यानंतर त्यांनी बायोमेडिकल इंजिनिअरिंग मधील smart and connected health हा विषय संशोधनासाठी निवडून त्यामध्ये डॉक्टरेट मिळवली आहे. 2019 साली त्यांचे हे संशोधन पूर्ण झाले.हे संशोधन करण्यासाठी ओंकार पाटील यांनी खूप कष्ट केले आहेत.
या संशोधनासाठी ओंकार पाटील यांना Dr.Zhanpeng jin आणि committee members Dr. Hiroki sayama, Dr.Guy German, Dr. Gretchen Mahler आणि Dr. Yu Chen यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
दरम्यान, ओंकार पाटील हे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महिपतराव मोहिते, मोहित्यांचे वडगाव यांचे नातू आहेत. त्यांचे आई वडील शिक्षक असून त्यांच्या संपूर्ण प्रवासामध्ये त्यांच्या आई वडिलांनी त्यांना खंबीरपणे साथ दिली आहे.










Leave a Reply