वडगाव-शिंदे गावात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीमेला प्रारंभ
पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या शैला खंडागळे यांच्या उपस्थितीत झाली सुरुवात

Pckhabar- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात कोविड -19 वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’
ही मोहीमचा प्रारंभ केला. पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या शैला खंडागळे यांच्या माध्यमातून वडगाव-शिंदे या गावांत ही मोहीम राबविण्यात आली. ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सदस्या शैला खंडागळे म्हणाल्या, शासनाचे नियम आनि कोविड संबंधित जी काही आवश्यक आरोग्य नियमावली असेल त्याचा काटेकोरपणे अवलंब करावा असे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले.
यावेळी हवेली तालुक्यातील मंडल अधिकारी, तलाठी भाऊसाहेब, सरपंच, उपसरपंच अणि ग्रामपंचायत सदस्य तसेच आरोग्य अधिकारी, आशा सेवक तसेच इतर सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.










Leave a Reply