Dehu News : देहु शहर भाजप आणि लॉयन्स क्लब ऑफ पुणे यांच्यातर्फे देहू कोविड सेंटरला वैद्यकीय साहित्यांची मदत

देहु शहर भाजप आणि लॉयन्स क्लब ऑफ पुणे यांच्यातर्फे देहू कोविड सेंटरला वैद्यकीय साहित्यांची मदत

Pckhabar-भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमीत्त महाराष्ट्र भाजपच्या वतीने सर्व महाराष्ट्रात सेवा सप्ताह साजरा होत आहे. याचे औचित्य साधुन उद्योजक आणि देहू ओबीसी आघाडीचे अध्यक्ष संदिप दिवाणराव परंडवाल यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ सामाजिक बांधिलकी जपत देहु शहर भाजप आणि लॉयन्स क्लब  ऑफ पुणे, चर्तुश्रृंगी यांच्या संयुक्त विद्यमाने देहू कोविड सेंटरला वैद्यकीय साहित्य वाटप करण्यात आले.

कोरोनाच्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळुन ही मदत करण्यात आली. वैद्यकीय साहित्य देहु कोवीड सेंटरचे व्यवस्थापक प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी किशोर यादव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

डायनेस्टि ग्रुह प्रकल्प व्यवस्थापकीय संचालक डिवाईन कविता परंडवाल बोरावके आणि लायन्स क्लब सदस्या यांचे विशेष सहकार्य लाभले.

वैद्यकीय साहित्यामध्ये विटॅमिन टॅब्लेटस, मास्क, सॅनिटायझर, अर्सेनिक अल्बम इ. समावेश आहे. याप्रसंगी पुणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष बाळासाहेब काळोखे,अध्यक्ष‌ लॉयन्स क्लबचे अध्यक्ष अरूण खानोलकर, लॉयन्स क्लबचे सचिव विजय भिसे, उपसरपंच स्वप्निल आप्पा काळोखे, माजी उपसरपंच संतोष हगवणे, शहराध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल, व्हाईस चेअरमन नारायण पचपिंड, कार्याध्यक्ष प्रकाश मोेरे, अध्यक्ष संजय जंबुकर, नरेंद्र मोदी विचार मंच महामंत्री सुनिल घोडेकर, नरेंद्र मोदी विचार मंच राष्ट्रीय सचिव सोनाली घोडेकर, महिला आघाडी सुजाता माने, युवती आघाडी अध्यक्ष कु. पुजा बुधावले, उपाध्यक्ष सचिन काळोखे, गणेश परंडवाल, सरचिटणीस प्रविण कांबळे, विधार्थी आघाडी सरचिटणीस अभय पडोसकर, सरचिटणीस सागर मुसुडगे, सोशल मीडिया आघाडी अध्यक्ष गणेश शेवकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *