पँथर रिपब्लिकन पार्टी (एस) चे पुणे जिल्ह्यात पदांचे वाटप
Pckhabar-भारतीय संविधानाच्या विचारावर आधारित असलेल्या पँथर रिपब्लिकन पार्टी (एस)चे पुणे जिल्ह्यात पदांचे वाटप करण्यात आले.
पिंपरी चिंचवड शहर वाहतूक आघाडीच्या अध्यक्षपदी मोहन अहिरे यांची ; तर पुणे शहर महिला आघाडीच्या अध्यक्षपदी आशाताई लोळे यांची नियुक्ती करण्यात आली. पार्टीचे संस्थापक अध्यक्ष गौतम डोळस यांनी पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा केली, तसेच नियुक्तीपत्र देण्यात आले.
पँथर रिपब्लिकन पार्टीतून बाहेर पडत गौतम डोळस यांनी समाजवादी विचारांना अनुसरून पँथर रिपब्लिकन पार्टी (एस) या स्वतंत्र पार्टीची नुकतीच घोषणा केली. पार्टीचे सुरुवातीला जिल्हाभर जाळे विस्तारित करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यभर पार्टीचा विस्तार करण्यात येणार आहे, असे संस्थापक अध्यक्ष गौतम डोळस यांनी सांगितले.
नूतन पदाधिकाऱ्यांनी सांगितले, की पार्टीच्या ध्येयधोरणानुसार काम करणार असून, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच आगामी महापालिका निवडणुकीत पार्टीचा झेंडा उंचावण्यासाठी सर्व स्तरातील कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार आहे.










Leave a Reply