Pimpri News: डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयास ‘राष्ट्रीय उत्कृष्ट संस्थान विश्वकर्मा’पुरस्कार

डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयास ‘राष्ट्रीय उत्कृष्ट संस्थान विश्वकर्मा’पुरस्कार

Pckhabar- पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च महाविद्यालयास राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट संस्थान विश्वकर्मा पुरस्कार 2020 हा सन्मान प्राप्त झाला आहे.
विश्वकर्मा पुरस्कारांची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल-निशंक, एआयसीटीईचे चेअरमन डॉ.अनिल सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीत ऑनलाइन माध्यमातून झाली. हा पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्रातील एकमेव फार्मसी महाविद्यालय ठरले आहे व देशभरातील 03 फार्मसी महाविद्यालयांमध्ये समावेश झाला आहे. इंडिया फाइट्स कोरोना या थीम वरती सदर पुरस्कार एआयसीटीईतर्फे प्राप्त झाला आहे.
कोविड 19 लढाई विरुद्ध महाविद्यालयाने घेतलेले पुढाकार व योगदान या विषयांतर्गत विविध निकषांवरती तीन टप्प्यांमध्ये मूल्यमापन करण्यात आले. देशभरातून एकूण 900 महाविद्यालयांनी सदर पुरस्कारांसाठी सहभाग नोंदविला. महाविद्यालयास कौन्सेल्लिंग अँड टेलि सपोर्ट या श्रेणीत 3 रे स्थान प्राप्त झाले आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण कल्पना, वैज्ञानिक प्रवृत्ती, शैक्षणिक संस्थांच्या सामाजिक योगदानास समाजात ओळख व सन्मान प्राप्त करून देणे व त्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी या उद्देशास अनुसरून ऑल इंडिया कौन्सील फॉर टेक्नीकल एज्युकेशन तर्फे विश्वकर्मा पुरस्कार देण्यात आले.
  महाविद्यालयाच्या यशाबद्दल डॉ. डी. वाय. पाटील यूनिटेक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, उपाध्यक्षा डॉ.  भाग्यश्री पाटील, संस्थेचे सचिव डॉ. सोमनाथ पाटील व विश्वस्थ डॉ. स्मितादेवी जाधव यांनी प्राचार्य डॉ. सोहन चितलांगे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच सर्व भागधारक यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *