IPL News : मुंबई इंडिन्सचा whatsapp नंबर सेव्ह करा आणि अपडेट मिळवा

IPL News : मुंबई इंडिन्सचा whatsapp नंबर सेव्ह करा आणि अपडेट मिळवा
आज रंगणार मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पहिला सामना

Pckhabar-कोरोनामुळे युएईमध्ये होत असलेल्या आयपीएलचे सामने स्टेडियममध्ये जावून चाहत्यांना पाहता येणार नाहीत. मुंबई इंडियन्स सारख्या संघाच्या चाहत्यांची संख्या सर्वाधिक आहे. अशा चाहत्यांसाठी मुंबई संघाने सर्व अपडेट मिळवण्यासाठी एक whatsapp नंबर दिला आहे.

आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने आतापर्यंत चार विजेतेपद मिळवली आहेत. या वर्षी आयपीएलमधील पहिला सामना आज (शनिवार) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. हे दोन्ही संघ गतविजेते आणि उपविजेते आहेत. या वर्षीही विजेतेपदासाठी फेव्हरेट मुंबईचा संघ आहे.

या वर्षी कोरोना व्हायरसमुळे आयपीएल स्पर्धा युएईमध्ये होते आहे. त्यामुळे चाहत्यांना मैदानात जाऊन संघाला सपोर्ट करता येणार नाही. क्रिकेटपटूंना जसे चाहत्यांशिवाय गमत नाही तसेच चाहत्यांना देखील क्रिकेटच्या मैदानावर गेल्याशिवाय करमत नाही. पण यावेळी प्रेक्षकांशिवाय खेळावे लागणारे आहे.
पण तुम्हाला मैदानात जाता येत नसेल तरी मुंबई संघाचे सर्व अपडेट मिळवून देण्याची सोय करण्यात आली आहे. अगदी सराव, खेळाडूंचे फोटो, व्हिडिओ आदी सर्व गोष्टी आणि सर्व अपडेट अगदी तुमच्या हातात येणार आहेत.

मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना हे सर्व मिळणार आहे ते त्यांच्या मोबाइलवरमोबाइलवर. ..
यासाठी मुंबई संघाने एक whatsapp दिला आहे. तुम्हाला फक्त इतक करायचे आहे की हा नंबर सेव्ह करून त्यावर whatsappवरून फक्त hi पाठवायचा आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *