Dehuroad Crime News:  व्यावसायिकाची साडेपाच लाखांची फसवणूक

Dehuroad Crime News:  व्यावसायिकाची साडेपाच लाखांची फसवणूक
Pckhabar- एका व्यावसायिकाला जस्ट डाईलवरून नंबर घेऊन फोन करत स्टिल देण्याचे अमिष दाखविले. स्टिल पाठवतो, असे सांगून खात्यावर 5 लाख 68 हजार 250 रूपये आरटीजीएसव्दारे पैसे घेऊन स्टिल न पाठविता फसवणूक केली. ही घटना देहूरोड येथे नुकतीच उघडकीस आली.
सचिन विलास पाटील (वय-35, रा. लोखंडी वस्ती, आळंदी रोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भट्टाचार्य (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक आहेत.  आरोपीने त्यांचा जस्ट डाईलवरून नंबर घेऊन स्टिल देण्याचे अमिष दाखविले. मागणीप्रमाणे स्टिल देण्याचे सांगून छत्तीसगड येथील एयु स्मॉल फाईनान्स बँक लि शाखा सुपेला भिलई (2021223327043480) या खातेक्रमाकांवर 5 लाख 68 हजार 250 रूपये आरटीजीएसव्दारे पाठविण्यास सांगितले. त्यानुसार पाटील यांनी पैसे दिले. मात्र, स्टिल न पाठविता फिर्यादी यांची आरोपीने फसवणूक केली.  फौजदार कणसे तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *