MNS News : मनसे चित्रपट सेनेत कार्यकर्त्यांचा प्रवेश
Pckhabar- पिंपरी चिंचवड शहरातील सिनेक्षेत्राशी निगडीत असंख्य तरुणांनी महाराष्ट्र चित्रपट सेनेत जाहीर प्रवेश केला.
मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेची राज्यव्यापी आढावा बैठक नुकतीच पार पडली. यावेळी 10 जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या नेमणुकाही करण्यात आल्या.
चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष रमेश परदेशी , सरचिटणीस शशांक नागवेकर, संदीप सावंत, जनहित कक्षाचे अध्यक्ष किशोर शिंदे , पिंपरी चिंचवड चित्रपट सेनेचे दत्ता घुले, तुकाराम शिंदे , शिवनाथ दिलपाक , दिपक भालेराव , प्रसाद खैरे , प्रणव आसरे आदी उपस्थित होते.










Leave a Reply