Talegaon News: लाल परी पूर्ण क्षमतेने धावणार, प्रवाशांकडून स्वागत
Pckhabar- महाराष्ट्र राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला पूर्ण प्रवासी क्षमतेने सेवा करण्याची परवानगी दिली आहे. या शासकीय निर्णयाचे तळेगाव दाभाडे एसटी आगारातून प्रवासी, वाहक, चालक यांच्याकडून स्वागत करण्यात आले.
मार्चपासून लॉकडाऊनमुळे सर्व प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली होती. यावर 20 जुलैला शासनाने सोशल डिस्टंसिंग पाळत गाडिच्या क्षमतेच्या 50 टक्क्के अंतर जिल्हा पद्धतीने वाहतूक सुरु करण्यास परवानगी दिली होती. या पद्धतीमुळे प्रवाशांची होणारी कोंडी व महामंडळाचे होणार या नुकसान डोळ्यासमोर ठेवून शासनाने आसन क्षमतेप्रमाणे पूर्ण वाहतुकीस परवानगी दिली आहे.
तळेगाव आगरा मधून मावळ तालुक्यांमध्ये स्थानिक पातळीवर दहा गाड्या व बाहेर जिल्ह्यामध्ये सात गाड्या पाठवल्या जातात. यामध्ये प्रवाशांच्या गर्दीचे प्रमाण कमी असेल तर नुकसानीला सामोरे जावे लागते. शासनाच्या या निर्णयामुळे प्रवासाच्या गर्दीचे प्रमाण वाढल्यानंतर पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे प्रवासी वाहतुकीचे काम सुरू करण्यात येईल. असे आगार प्रमुख प्रमोद दहातोंडे व स्थानक प्रमुख सांगडे यांनी सांगितले.
शासनाच्या नवीन धोरणानुसार प्रवासी वाहतूक करताना प्रवाशांनी माक्स वापरणे, सॅनीटायजरचा वापर करणे गरजेचे आहे. प्रवासासाठी गाडी आगारातून जाताना व आल्यानंतर तिचे पूर्णपणे सॅनीटाईज केले जाते. या सुरू झालेल्या प्रवासी वाहतुकीचा नागरिकांनी फायदा घ्यावा, असे आवाहन आगार प्रमुख प्रमोद दहातोंडे यांनी केले आहे.
Talegaon News: लाल परी पूर्ण क्षमतेने धावणार, प्रवाशांकडून स्वागत










Leave a Reply